सोलापूर -: सोलापूर जिल्ह्यातील (ग्रामीण) दारिद्रय रेषेखालील पिवळ्या कार्डधारकांसाठी 6955 क्विंटल नियंत्रीत साखरेचे नियतन मंजूर करण्यात आले आहे. ही साखर नोव्हेंबर 2013 या महिन्यात उचलावी व याच महिन्यात पात्र शिधापत्रीकाधारकांना प्रती व्यक्ती 500 ग्रॅम साखर वितरीत करण्यात यावी. माहे नोव्हेंबर 2013 करीत साखर कारखाना निहाय प्राप्त एकत्रीत नियतनाचा तपशील पुढीलप्रमाणे. 1) सहकार महर्षि शंकरराव मोहिते पाटील सह. साखर कारखाना (अकलुज) 1757 क्विंटल, 2) भैरवनाथ शुगर वर्क्स, विहाळ, ता. करमाळा 880 क्विंटल, 3) भिमा सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर, ता. मोहोळ 774 क्विंटल, 4) लोकनेते बाबुराव पाटील सह. सा. कारखाना अनगर, ता. मोहोळ 2368 क्विंटल, 5) सासवड माळी शुगर फॅक्टरी, माळीनगर, ता. माळशिरस 873 क्विंटल, 6) संत दामाजी सह. साखर कारखाना, मंगळवेढा 7 क्विंटल व 7) विठ्ठल शुगर मॅन्युफॅक्चरिंग, म्हैसगाव ता. माढा 336 क्विंटल.
     तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे उत्तर सोलापूर 269क्विंटल, दक्षिण सोलापूर 703 क्विंटल, अक्कलकोट 877 क्विंटल, बार्शी 1107 क्विंटल, मोहोळ 523 क्विंटल, माढा 560 क्विंटल, करमाळा 651 क्विंटल, पंढरपूर 438 क्विंटल, माळशिरस 760 क्विंटल, सांगोला 620 क्विंटल व मंगळवेढा 447 क्विंटल इतकी साखर देण्यात येणार आहे.
वरीलप्रमाणे मंजुर नियंत्रीत साखर दिनांक 31 ऑक्टोबर 2013 अखेर मुदत आहे. तथापी कार्डधारकांना वेळेवर साखर उपलब्ध व्हावी यासाठी सदरची साखर 31 ऑक्टोबर तारखेपूर्वी उचल करावी. जे साखर कारखाने केंद्र शासनाने मंजुर केलेले साखरेचे नियतन उपलब्ध करुन देणार नाहीत त्यांच्या विरुध्द जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 अंतर्गत गुन्हा दाखल करुन गोदामातील साखर जप्त करुन तहसिलदारांनी संबंधित तालुक्याला वितरीत करावी असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
     त्याचबरोबर सर्व तहसीलदारांनी अपात्र शिधापत्रीकाधारक, बोगस शिधापत्रीका किंवा त्याच शिधापत्रीकेवर दुबार किंवा त्यापेक्षा जादा वेळा साखर दिली जाणार नाही व साखरेचा अपहार व गैर मार्गाने विल्हेवाट लावली जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे जिल्हाधिकारी डॉ. प्रविण गेडाम यांनी एका पत्रकान्वये कळविले आहे.
 
Top