सोलापूर : चारचाकी वाहनाच्या नवीन नोंदणीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत 13 बीएन ही मालिका आज दि. 29 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनासाठी नोंदणी क्रमांक राखीव ठेवायचा आहे. अशा वाहनधारकांनी कार्यालयाने विहित केलेल्या शुल्काची रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे आजच (29 ऑक्टोबर) सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत कार्यालयीन मुख्य लिपिक श्री. व्हटकर यांचयाकडे जमा करावी.
    एखाद्या विशेष क्रमांकासाठी एका पेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास लिलाव पध्दतीने क्रमांकाचे वाटप करण्यात येईल. अर्जदाराने आपला डिमांड ड्राफ्ट राष्ट्रीयकृत अथवा शेड्युल्ड बँकेतुन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  ( Dy. RTO Solapur) या नांवे काढावा.
    तसेच ब्रेकींग सिस्टिम न बसविलेल्या अग्रीकल्चर ट्रेलरची नोंदणी बंद करण्यात आली होती. मात्र 17 ऑक्टोबर 2013 च्या अधिसूचनेनुसार सदर बंदी उठविण्यात आली असून अशा प्रकारची ब्रेकींग यंत्रणा नसलेल्या अग्रीकल्चर ट्रेलर्सच्या नवीन नोंदणी 31 ऑगस्ट 2014 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, दिपक पाटील यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.
 
Top