उस्मानाबाद :- जिल्हा परिषद, उस्मानाबादअंतर्गत्परिचर वर्ग-4 या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना या पदाचे प्रवेशपत्र 21 ऑक्टोबरपासून ऑनलाईन डाऊनलोड करण्याची सुविधा Osmanabad.nic.in वर सुरु करण्यात आली आहे.ज्या उमेदवारांनी प्रवेशपत्र काढले नाहीत, त्यांनी त्वरीत प्रवेशपत्र ऑनलाईन डाऊनलोड करुन घ्यावेत.
      तसेच लेखी परीक्षेकरीता उमदेवारांनी काळ्या शाईचा पेन व रायटिंग पॅड सोबत आणावेत, ज्या उमेदवारांचे प्रवेशपत्रावर फोटो व स्वाक्षरी नाही त्यांनी सोबत फोटो आयडी व स्वाक्षरीबाबत पुरावे सोबत घेवून यावेत. परीक्षा केंद्र- 39 व्ही.जे. शिंदे पॉलिटेकनिक  कॉलेज, वरुडा रोड,उस्मानाबाद, परीक्षा केंद्र-11 श्री श्री रविशंकर विद्यामंदिर,जाधववाडी रोड,उस्मानाबाद  येथे जाण्याकरीता बसची सुविधा बसस्थानक,उस्मानाबाद येथून करण्यात आली आहे. उमेदवारांनी वाहनाची व्यवस्था न झाल्यास सदरील परीक्षा केद्रांवर स्वताच्या जबाबदारीने अर्धातास अगोदर उपस्थित रहावे, असे आवाहन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) जिल्हा परिषद, उस्मानाबाद यांनी केले आहे. 
 
Top