उस्मानाबाद - जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांना त्यांच्यातील अंगभूत कलागुणांना वाव देता यावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि. 11 ते 13 डिसेंबर, 2013 या कालावधीत उस्मानाबाद येथे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 
    यासंदर्भात नुकतीच अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. सर्व उपजिल्हाधिकारी, उस्मानाबाद तालुक्याचे तहसीलदार यांची यावेळी उपस्थिती होती. महोत्सवाचे समन्वयक करण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) शिल्पा करमरकर यांच्यावर देण्यात आली आहे. जिल्ह्यातील विविध सांस्कृतिक व कला प्रकारात जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संस्थांनी यासंदर्भात उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन), जिल्हाधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
      जिल्हा प्रशासनाकडे संपर्क साधणा-या जिल्ह्यातील स्थानिक कलावंतांची निवड करुन त्यांना या महोत्सवात आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
 
Top