सातारा -: छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते रविवारी विजयादशमीच्या मुहुर्तावर ऐतिहासिक भवानी तलवारीचे पारंपारिक पध्दतीने पूजन करण्यात आले. त्यानंतर भोसले यांनी साता-यातील प्रतिष्ठित व मानक-यांसह सीमोल्लंघन केले.
छत्रपती शिवरायांची कुलदेवता श्री तुळजाभवानी मातेचे नवरात्र, धार्मिक आणि विविध पारंपारिक कार्यक्रम दरवर्षी सातारा येथील जलमंदिर पॅलेसमध्ये भोसले परिवारातर्फे साजरे केले जातात. विजयादशमीला भवानी तलवारीचे पूजन केले जाते. रविवारी सायंकाळी उदयनराजे भोसले यांनी हे विधिवत पूजन केले. त्यांचे चिरंजीव रुद्रनीलराजे व परिवारातील सदस्य त्यांच्यासमवेत उपस्थित होते. पूजेनंतर जलमंदिर ते पोवई नाकादरम्यान सीमोल्लंघनाची मिरवणूक काढण्यात आली.