बार्शी -: शहरातील विविध भागातून मोटारसायलची चोरी करणार्‍या दोघा आरोपींना बार्शी पोलिसांनी चोरी करतांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून ७ मोटारसायकल जप्त केल्या आहेत.
    सुनिल उर्फ भिमा लक्ष्‍मण शिंदे (वय 29, रा. आंदोरा, ता. कळंब, जि. उस्‍मानाबाद) व संजीय विठ्ठल पवार (वय 25, रा. सिंदफळ, ता. तुळजापूर) अशी अटक केलेल्‍या आरोपींची नावे आहेत.
    मागील दोन महिन्‍यांपासून बार्शी शहरात मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. पोलीस चोरांचा कसुन तपास करत होते. मिळालेल्‍या म‍ाहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना अटक केली.
    चोरट्यांकडून चार मोटारसायकल भूम येथून, एक खडा येथून तर दोन तुळजापूर येथून पोलिसांनी हस्‍तगत केल्‍या आहेत. पोलीस अधिक्षक राजेश प्रधान, उप‍अधिक्षक रोहिदास पवार, पोलीस निरीक्षक सालार चाऊस यांच्‍या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक डाके, पो.कॉं. प्रविण चौधरी, गणेश पवार, शरद चव्‍हाण, सादिक नाईकवाडी यांच्‍या प‍थकाने सदरची कारवाई केली.
 
Top