बीड (सोमनाथ खताळ) -: दुर्गा मातेचा एक उत्साह पुर्ण सण म्हणजे नवरात्रोत्सव. या महोत्सवात महिला, मुलींची होणारी छेडछाड यावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी चिडीमार पथकाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. एवढेच नाही तर जे सार्वजनीक ठिकाणी महिला, मुली जाताना मोठे आवाज करतील, त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करण्‍यात येणार आहे. बीड शहरातील खंडेश्‍वरी देवी बरोबरच खासबाग यासारख्‍या आदी मंदीरांच्‍या ठिकाणी हे चिडीमार पथक साध्‍या कपड्यांमध्‍ये तळ ठोकुन उभे राहणार आहे. प्रेम करणा-यांना आमचा विरोध नाही मात्र प्रेम करणा-यांनी सार्वजनिक ठिकाणी अथवा इतर कोठेही प्रेमाच्‍या नावाखाली अश्‍लील चाळे करु नयेत, असे योवेळी चिडीमार पथकाकडुन ऐकावयास ङ्किळाले.
    बीड शहरातील नावाजलेले मंदीर माता खंडेश्‍वरी देवी परिसरात शहरातील महिला, मुली मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी जात असतात, दर्शनासाठी  येणा-या महिलांची छेड काढण्‍यासाठी अनेक टवाळखोर सक्रिय असल्‍याचे सर्वश्रूत आहे. अशा टवाळखोरांना पकडण्‍यासाठी चिडीमार पथकाला हे नऊ दिवस चांगलीच कसरत करावी लागणार आहे. आता दिवसेंदिवस छेडछाड, बलात्कार यासारख्‍या घटना वाढत आहेत. याला आळा बसावा म्हणुन चिडीमार पथकाची नियुक्ती केली. यात हे पथक जवळपास यशस्वीही झाले आहे. मात्र या पथकाची खरी कसरत राहणार आहे ती दोन दिवसावर आलेल्‍या नवरात्रोत्सवात. खंडेश्‍वरी देवी मंदिर परिसरात अनेक महिला, मुली दर्शनासाठी तसेच विविध वस्तु खरेदी करण्‍यासाठी येत असतात. या नऊ दिवसात प्रशासनाकडुन मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्‍यात येत असतो. मात्र तरीही काही टवाळखोर हे महिला, मुलींची छेड काढत असतात, अशा टवाळखोरांवर नजर ठेऊन त्‍यांना चोप देण्‍यासाठी चिडीमार पथकाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. शहरातील सार्वजनिक, देवीचा मंदिर परिसर अशा या नवरात्रोत्सवात चिडीमार पथकाचे कर्मचारी तळ ठोकुन उभे असणार आहेत. त्‍यामुळे टवाळखोरांना कुठलेही गैरकृत्‍य अथवा त्‍यांची छेड काढता येणार नाही.
     पहाटे चार वाजल्‍यापासुन ते रात्रीपर्यंत हे पथक आपले कर्तव्‍य बजावणार आहे. शहरात एकुण तीन पथकांमध्‍ये १५ कर्मचारी आहेत. काही कर्मचारी मंदिराच्‍या ठिकाणी तर काही कर्मचारी शहरात फिरत असलेल्‍या टवाळखोरांवर नजर ठेवणार आहेत. आमचा प्रेमाला विरोध नाही. काही तरुण-तरुणी अल्पवयीन असतात, अशा मुलांना आम्ही पकडुन समज देतो व त्‍यांच्‍या आई-वडिलांकडे सोपवतो. मात्र जे काही तरुण, तरुणी, महिला, पुरुष प्रेमाच्‍या नावाखाली अश्‍लील चाळे करतात अशांना आम्ही चोप देऊन त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करतो, असे मत चडीमार पथकातील कर्मचा-यांनी बोलताना सांगितले.
 
Top