रांची :- चारा घोटाळ्यात दोषी ठरविण्‍यात आलले बिहारचे माजी मुख्‍यमंत्री लालू प्रसाद यादव यांना सीबीआय न्‍यायालयाने 5 वर्षांच्‍या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय त्‍यांना 25 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्‍यात आला आहे. सीबीआय न्‍यायालयाने लालू यादव यांच्‍या वकीलांचा युक्तीवाद अमान्‍य केला. सीबीआयच्‍या विशेष न्‍यायालयातर्फे व्हिडिओ कॉन्‍फरंसद्वारे शिक्षेवर सुनावणी झाली. दोन्‍ही बाजुंचा युक्तीवाद दुपारी 12 वाजता पूर्ण झाला. आजारी असल्‍यामुळे कमी शिक्षा द्यावी, अशी विनंती लालू यादव यांच्‍या वकीलांनी केली होती.
       न्‍यायालयाच्‍या निर्णयामुळे लालू यादव आणि त्‍यांचा राष्‍ट्रीय जनता दल या पक्षाला मोठा फटका बसला आहे. लालू यादव यांची खासदारकी रद्द झाली आहे. तसेच त्‍यांना 6 वर्षे कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही. तसेच त्‍यानंतरची 5 वर्षे लोकसभेची निवडणूक होणार नाही. त्‍यामुळे एकूण्‍ा 11 वर्षे ते निवडणुकीच्‍या रिंगणातून बाहेर झाले आहेत.  न्‍यायालयाने दिलेल्‍या निर्णयावर राजदचे प्रवक्ते मनोज झा यांनी प्रतिक्रीया दिली. आम्‍ही निकालाचा अभ्‍यास करु. त्‍यानंतर उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल करण्‍यात येईल. पक्षाचे प्रमुख म्‍हणून निश्चितच काही परिणाम होईल. मात्र, आम्‍ही वरीष्‍ठ न्‍यायालयात आम्‍ही अधिक प्रभावीपणे बाजू मांडू, असे झा यांनी सांगितले.
     जगन्‍नाथ मिश्रा आणि जगदीश शर्मा यांना 4 वर्षांची शिक्षा ठोठावण्‍यात आली आहे. बहुतांश आरोपींना 4 वर्षांची शिक्षा देण्‍यात आली आहे.
        न्‍यायालयाने सोमवारी 17 वर्षांपुर्वीच्‍या चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यादव, मिश्र यांच्‍यासह 45 जणांना दोषी ठरविले होते. त्‍यात जेडीयूचे खासदार जगदीश शर्मा यांचाही समावेश आहे. यापैकी 8 जणांना न्‍यायालयाने त्‍याच दिवशी प्रत्‍येकी 3 वर्षांची शिक्षा ठोठावली होती. दरम्‍यान, शिक्षेवर सुनावणीपूर्वी लालू यादव यांनी तुरुंगातच राहणार असल्‍याचे सांगितले. तेथील हवा ताजी हवा आहे, असे ते म्‍हणाले.
      लालू यादव यांनी बुधवारी काही कुटुंबियांसह पक्षाच्‍या 5 ज्‍येष्‍ठ नेत्‍यांसोबत तुरुंगातच भेट घेतली. शिक्षा सुनावल्‍यानंतर रिम्‍सच्‍या एका कॉटेजमध्‍ये त्‍यांच्‍या राहण्‍याची सोय करण्‍यात येणार आहे. त्‍यावेळी ते म्‍हणाले, मला तुरुंगातच राहणार आहे. कॉटेजमध्‍ये कशा जायचे? मी म्‍हाताराही नाही. आजारीही नाही. याशिवाय तेथे श्‍वास कोंडल्‍या जाईल. त्‍यापेक्षा येथे ताजी हवा आहे. पायी फे-या मारण्‍याचीही सोय आहे. मी येथेच राहील.
        लालू यादव यांना तुरुंगातील उच्‍च श्रेणी वॉर्ड क्रमांक 2 मध्‍ये ठेवण्‍यात आले आहे. तसेच जगन्नाथ मिश्र यांना 11 क्रमांकाच्‍या कॉटेजमध्‍ये हलविण्‍यात आले आहे. लालू यादव यांना कैदी क्रमांक 3312 देण्‍यात आला आहे.
 
Top