बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : वैराग (ता. बार्शी) येथील लोक अदालत कार्यक्रमांतर्गत फौजदारी व दिवाणी २८७ खटल्यांची प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. मा. उच्च न्यायालयाच्या न्याय जनतेच्या दारी या संकल्पनेनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रमुख जिल्हा न्यायाधिश अश्विन कुमार देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली न्या.व्ही.बी. मुल्ला यांनी वैराग (ता. बार्शी) येथे फिरते लोकअदालन घेतले. सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत सुरु ठेवलेल्या कामकाजास नागरिकांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवून प्रतिसाद दिला.
यावेळी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्या.व्ही.के.मांडे, न्या. शेख यांनी सहभागाबाबत आवाहन केले. बार्शी बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड्. प्रविण करंजकर, उपाध्यक्ष अँड. महेश जगताप, अँड. निळकंठ कुलकर्णी, अँड. एस.एम. गुंड, अँड. एन.एम.पाटील, अँड. आर.यु.वैद्य, अँड. एन.एम.पाटील, अँड. एस.के.शिंदे, अँड.एस.बी.कापसे, अँड. पद्माकर काटमोरे या वकिल मंडळींनी सहभाग नोंदवत सहकार्य केले.