बीड –: शिरुरकासार तालुक्यातील मालकाची वाडी या गावातील अर्ध्याधिक लोकांना पाय वाकडे झाले आहेत. शेतात राहायला आलेल्या पाच-पंचवीस कुटुंबाची एक वस्ती तयार झाली. त्या वस्तीला हनुमान नगर असे नाव देण्यात आले. ज्या वेळी हे ग्रामस्थ्‍मालकाचीवाडी या ठिकाणी राहत होते. तेव्हा ते कुठल्याही आजाराने त्रस्त नव्हते मात्र हनुमान नगर येथे राहायला आपल्यापासून आवघ्या काही वर्षांनी ही वस्ती एक वेगळयाच आजाराने पछाडली. कुणाच्या करमेत बाक तर काहीचे गुडघ्याचे हाड दबले,करमेखालच्या पायाचे आकार बदलले या आजाराने त्रस्त हाऊन देवराव राम यांचे निधन झाले. या गावातील लोकांवर बरेच इलाज केले परंतू कोठेच उपचार होऊ शकत नाही. 
    या आजाराने अर्धी वस्ती जवळपास परतीच्या पंगत्वाच्या वाटेवर आली आहे. या विचित्र गंभीर आजारावर संशधन होऊन रुग्णांवर उपचार करावेत,अशी मागणी होत आहे.  
 
Top