लंडन -: इंटरनेट सध्या जगभरातील बहुसंख्या लोकांचे दैनंदिन आयुष्यातील महत्वाचे घटक बनले आहे. इंटरनेटचे अनेक लाभ आहेत. आता त्याचा वापर वैज्ञानिक आता काही संवेदकांच्या मदतीने खोल सागरात होणा-या भुकंपाचा अंदाज घेण्यासाठी व त्सुनामीची पूर्वसुचना मिळवण्यासाठी करीत आहेत. खोल समुद्रात असलेले आंतरजालक म्हणजे इंटरनेट हे त्सुनामी सागरी प्रदूषन या दोन्हींचा अंदाज देऊ शकते. बफेलो विदयापीठातील सहरय्यक प्राध्यापक टोमासेा मेलोडिया यांनी सांगीतले की सरगराखाली खोलवर असलेल्या जाळयाची मदत आपण सागराच्या प्रष्ठभागाखाली होत असलेल्या घडामोडी टिपण्यासाठी करु शकतो. स्मार्टफोन व संगणकवरही माहिती कुणालाही सहज उपलब्ध करुन देता येईल व प्राणहानी टाळता येईल. जमिनीवरुन जाणारे अंतरजरलक (इंटरनेट) हे रेडिओ लहरींवर चालते ते माहिती उपग्रह किंवा अँटेनामार्फत प्रक्षेपीत करीत असते. दुर्दैवाने रेडिओ लहरी या पाण्याखाली प्रभावीपणे काम करु शकत नाहीत. त्यामुळे नेव्ही अँड नॅशनल ओशनक अँटमॉस्फेरिक अँडमिनिस्ट्रशन या अमेरीकी संस्थेने पाण्याखाली संदेशवहणासाठी ध्वनिलहरींवर आधारित आंतरजालक यंत्रणा चालवण्यासाठी ध्वनिलहरींवर आधारित संदेशवहन तंत्र विकसित केले आहे. मेलोडिया यांच्या मते खोल सागरातील आंतरजालक म्हणजे इंटरनेटमुळे अनेक प्रणाली एकत्र जोडून त्सुनामीचा अंदाज घेता येईल. अतिशय विश्वासार्ह अशी इशारावजा माहिती आपल्याला मिळू शकेल,त्यामूळे किनारी भागातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवणे सोपे जाईल.