सोलापूर -  पदवीधर व शिक्षक मतदारसंघ पुणे विभाग पुणे च्या प्रारुप मतदारयाद्या दिनांक 1.10.2013 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. अद्यापपर्यंत ज्या शिक्षकांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेली / केलेली नाही अशा शिक्षक मतदारांनी मतदार नोंदणीबाबत जागृती करुन नमुना क्र. 19 भरुन कागदपत्रांची पूर्तता करावी. तसेच दि. मतदार नोंदणी दि. 30 ऑक्टोबर पर्यंत करावी.
    त्याचप्रमाणे पदवीधर मतदार संघासाठी संबंधित शैक्षणिक संस्था/बँका/फर्म/संचालक यांनीही ज्या पदवीधारकांची नावे मतदारयादीमध्ये समाविष्ट झालेली/केलेली नाही अशा पदवीधारक मतदारांनी नमुना क्र. 18 भरुन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन घेऊन मतदार नोंदणी करुन घेण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी, सोलापूर यांनी केले आहे.
 
Top