उमरगा : शहरातील एका घराची घरफोडी करुन अज्ञात चोरट्यानी सोन्‍याचांदीचे दागिने व रोख मिळून असे मिळून सुमारे 80 हजार रुपये किंमताचा ऐवज लंपास केल्‍याची घटना रविवार रोजी उमरगा शहरातील अजय नगर भागात घडली.
    शिक्षक असलेले बसवराज गुरुलिंगप्पा स्वामी (हिरेमठ) यांचे अजय नगर भागात घर आहे. शनिवारी रात्री ते परिवारासह दुसर्‍या खोलीत झोपले होते.रविवारी पहाटे १ते ४ वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या हॉलच्या खिडकीच्या गज वाकवून आत प्रवेश केला. कपाटाचेही कुलूप तोडून त्यातील ६0 हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, २ हजार रुपये किमतीचे तांबे,  कानातील झुमके किंमत १४ हजार व पॅन्टच्या खिशातील रोख ७ हजार असा एकूण ८३ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद स्वामी यांनी दिली आहे. त्यावरुन उमरगा पोलिस ठाण्यातगुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सपोफौ बी. एन. काळे हे करीत आहेत.
 
Top