नळदुर्ग : तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी तांडे, वाड्या स्वतंत्र करणे गरजेचे आहे. त्यासाठीच वडाच्या तांड्याला स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले.
    वडाचा तांडा (ता. तुळजापूर) येथे स्वतंत्र ग्रामपंचायतीचे उदघाटन तसेच तांडा सुधार योजनेंतर्गत ६ लाख रुपयाचे सिमेंट रस्ते, तीन लाख रुपयाची पाणीपुरवठा योजना आदी कामांचा लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील तर अशोक मगर, पंडित जोकार, गटविकास अधिकारी खिल्लारे, वैभव जाधव, नगरसेवक शहबाज काझी, सरपंच संजय गुंजोटे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक सुभाष राठोड यांनी तर सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले. आभार संजय गुंजोटे यांनी मानले. कार्यक्रमास शिवराम राठोड, श्रीमंत राठोड, पुनमचंद राठोड, अशोक राजमाने, टी.जे. जाधव, प्रभाकर पाटील उपस्थित होते.
 
Top