कळंब (बालाजी जाधव) : मराठा समाज हा आरक्षणासाठी लढत आहे. मात्र आमच्या सहनशिलतेचा अंत सरकारने पाहू नये, येणा-या लोकसभा निवडणुकीपूर्वी आरक्षणाचा मुद्दा मार्गे लावावा, अन्यथा याचे दुष्परिणाम सत्ताधा-यांना भोगावे लागतील, असा इशारा युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी दिला आहे.
रविवार रोजी कळंब येथील साई मंगलम् मंगल कार्यालयात मराठा कृती समितीच्यावतीने मराठा आरक्षण इशारा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले म्हणाले की, गुणवत्ता असूनही केवळ आरक्षण नसल्याने मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांची पिछेहाट होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गावोगावी फिरुन पाहणी करावी, तसेच नारायण राणे समितीने इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे, मराठा आरक्षणाच्या संदर्भातील अभ्यासाकरीता नारायण राणे समितीचे सदस्य महाराष्ट्रासह वेगवेगळ्या राज्यात फिरत आहेत. समितीचे सदस्यांना त्या त्या तालुक्याच्या स्थानिक आमदारांनी भेटून आरक्षणाची मागणी करायला पाहिजे, आरक्षणा संदर्भात सर्वच मराठा संघटना एकत्र आहेत. या संघटनाना पाठबळ देण्यासाठी सर्व मराठा समाजाने एकत्र येण्याची गरज असल्याचे छत्रपती भोसले म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शिवाजी कापसे होते. तर शिवसेनेचे जिल्हाउपाध्यक्ष अजित पिंगळे, उपनगराध्यक्ष पांडुरंग कुंभार, मनसेचे कळंब तालुकाध्यक्ष बाळासाहेब कोठावळे, भाजपचे मिनाज शेख, राष्ट्रवादीचे प्रा. श्रीधर भवर, शिवसेनेचे गोपाळ चोंदे, कॉंग्रेसचे आप्पासाहेब शेळके, गोकुळ शेळके, अनंत चोंदे, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे जिल्हाध्यक्ष सागर बाराते, अनिता लोमटे, बालाजी जाधवर, गजानन चोंदे, अतुल गायकवाड, सुरज माने, प्रशांत लोमटे, शिवाजी गिड्डे आदींची उपस्थिती होती. यावेळी उस्मानाबाद-कळंबचे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, संभाजी बिग्रेडचे माजी प्रदेशाध्यक्ष अनंत चोंदे, ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतुल गायकवाड यांनी तर सुत्रसंचालन प्राचार्य जगदीश गवळी यांनी केले. कार्यक्रमाच्या वेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी मराठा समाजातील युवक वर्ग व नागरीक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.