कळंब (बालाजी जाधव) -: येथील समता इंग्‍लीश स्‍कूल डिकसळ येथे कास्‍ट्राईब महासंघाच्‍या कळंब तालुका शाखेची बैठक कास्‍ट्राईब कम्रचारी कल्‍याण महासंघाचे अध्‍यक्ष लक्ष्‍मण धावारे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली तर पी.के. निरफळ यांच्‍या प्रमुख उपस्थितीत घेण्‍यात आली.
    प्रमुख मान्‍यवरांच्‍या हस्‍ते महात्‍मा गांधीजी व सावित्रीबाई फुले यांच्‍या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्‍यात आली. त्‍यांनतर कास्‍ट्राईब कर्मचारी कल्‍याण महासंघाच्‍या तालुका कार्यकारिणी, पदाधिका-यांची निवड करण्‍यात आली. महासंघाच्‍या तालुका उपाध्‍यक्षपदी समता इंग्‍लीश स्‍कूलचे संस्‍थाध्‍यक्ष राजेंद्र खडबडे यांची निवड करण्‍यात आली. तर सल्‍लागरपदी प्रा. अनिल जगताप, प्रसिध्‍दी प्रमुखपदी प्रा. सोमनाथ कसबे, संतोष गायकवाड यांची निवड करुन त्‍यांना नियुक्‍तीपत्र देण्‍यात आले. निवडी झालेल्‍या पदाधिका-यांचे यावेळी सत्‍कार करण्‍यात आला. या कार्यक्रमाचे अध्‍यक्ष लक्ष्‍मण धावारे, महासंघाचे नूतन उपाध्‍यक्ष राजेंद्र खडबडे, अनिल जगताप यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले.
    कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी समता इंग्‍लीश स्‍कुलचे मुख्‍याध्‍यापक राजेंद्र कापसे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्‍तर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद माळी यांनी केले तर सचिन ताकपिरे यांनी आभार मानले.

समता इंग्‍लीश स्‍कूलमध्‍ये गांधी जयंती साजरी
कळंब -:
समता इंग्‍लीश स्‍कूल, डिकसळ, कळंब येथे राष्‍ट्रपती महात्‍मा गांधीजी यांची 144 वी जयंती उत्‍साहात साजरा करण्‍यात आली. सकाळी नऊ वाजून पाच मिनिटानी शाळेच्‍या प्रागंणात संस्‍थेचे अध्‍यक्ष राजेंद्र खडबडे, प्रा. एस.व्‍ही. कापरे यांच्‍या हस्‍ते महात्‍मा गांधी यांच्‍या प्रतिमेचे पूजन करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी शाळेचे मुख्‍याध्‍यापक राजेंद्र कापसे हे होते. आयोजित कार्यक्रमात विविध सांस्‍कृतिक कार्यक्रम घेण्‍यात आले. यात वक्‍तृत्‍व स्‍पर्धा, रांगोळी स्‍पर्धा, वेशभूषा हे कार्यक्रम घेण्‍यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे.आर. शेख यांनी केले तर शरद माळी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी एस.एन. आगरकर, ए.एम. माळी, व्‍ही.एम. माळी, आर.सी. मोरे आदींनी परिश्रम घेतले.
 
Top