कळंब (बालाजी जाधव) -: राज्‍य शासनाने नुकतेच जेष्‍ठ नागरीक धोरण जाहिर केले असून जेष्‍ठ नागरीक संघटनेने वेळोवेळी आपल्‍या मागण्‍याद्वारे जेष्‍ठांचे प्रश्‍न व व्‍यथा सरकारसमोर मांडल्‍या. यातील काही अंशी मागण्‍या पूर्ण झाल्‍या असल्‍या तरी मंजुर मागण्‍या व बाकी मागण्‍यासाठी जेष्‍ठ नागरिकांनी संघटनेच्‍या माध्‍यमातून एकत्र येण्‍याचे आवाहन कळंब तालुका जेष्‍ठ नागरीक संघाचे अध्‍यक्ष ह.भ.प. महादेव महाराज अडसुळ यांनी केले.
    श्री संत ज्ञानेश्‍वर निराधार बालक आश्रम तांदुळवाडी रोड, कळंब येथे जेष्‍ठ नागरिक दिनानिमित्‍त आयोजित बैठकीत ह.भ.प. महादेव महाराज अडसुळ हे अध्‍यक्षस्‍थानावरुन बोलत होते.  पुढे बोलताना ते म्‍हणाले, केंद्र शासनाकडे 60 वर्ष ही जेष्‍ठासाठी वयोमर्यादा आहे. परंतु महाराष्‍ट्राकडे ती 65 वर्ष आहे, ही तफावत दुर करावी, अशी मागणी त्‍यांनी यावेळी केली.
    याप्रसंगी व्‍यासपीठावर संघटनेचे भिमराव पांचाळ, जगन्‍नाथ मिटकरी, महाजन शाहीर, राणा जोगदंड, अच्‍युत माने, श्रीमती कमलाताई बोराडे, माधवसिंग रजपूत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    भिमराव पांचाळ यांनी आपल्‍या भाषणात अडचणीत असलेल्‍या जेष्‍ठांचे प्रयत्‍न संघटनेद्वारे सोडविता येतील, असे सांगितले. राणा जोगदंड यांनी सांगितले, संघटनेनी शासन व समाज यांच्‍यातील दुवा म्‍हणून काम करावे, संघटनेत महिलांचा सहभाग वाढवावा, असेही त्‍यांनी सांगितले. अच्‍युत माने यांनी आई-वडीलांना न सांभाळणा-या मुलांना डिफॉल्‍टर जाहीर करण्‍याच्‍या धोरणाचे स्‍वागत केले.
    कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी ज्ञानेश्‍वर लोमटे, किसन देशमुख, शिवाजी चव्‍हाण, विश्‍वास तांबारे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अच्‍युत माने यांनी तर आभार माधवसिंग राजपुत यांनी मानले.
 
Top