उस्मानाबाद :- राज्य निवडणूक आयोगाने जानेवारी ते जुन 2014 मध्ये लोहारा तालुक्यातील नागराळ व बेंडकाळ आणि वाशी तालुक्यातील फक्राबाद व डोंगरेवाडी या ग्रामपंचायतीच्या मुदती संपत असल्याने या ग्रामपंचायतीच्या प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम शासनाने जाहीर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांनी दिली.
प्रभाग रचना व आरक्षणबाबत नमुना ब वर हरकती व सूचना 8 ऑक्टोबर पर्यत जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत निवडणूक शाखेत कार्यालयीन वेळेत व शासकीय सुट्या वगळून समक्ष हरकती व सूचना दाखल करता येईल. नमुना ब वरील हरकती व सूचना विहीत मुदतीत व वेळेत ग्रामपंचायत निवडणूक शाखेत समक्ष प्राप्त न झाल्यास त्याचा विचार केला जाणार नाही, असेही कळविण्यात आले आहे.