उस्मानाबाद -: नव्या पिढीस निसर्ग आणि वन्यजीवाची माहिती व्हावी, आस्था निर्माण होण्यासाठी वनविभागामार्फत वन्यजीव सप्ताह 7 ऑक्टोंबर पर्यत साजरा करण्यात येणार आहे. सप्ताहानिमित्त जिल्ह्यात निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धा नि:शुल्क आहेत. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावे, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी निबंध शिक्षण संस्थेच्या प्रमुखांमार्फत स्थानिक संबंधित जिल्ह्यातील वनपरिपक्षेत्र (प्रादेशिक) किंवा स्थानिक उप वनसंरक्षण (प्रादेशिक) यांच्याकडे दि. 7 ऑक्टोंबरपर्यंत पाठवावयाचे आहेत.