असो कितीही मोठा रावण, चला त्यायाला जाळू या
ताकद असते एकजुटीची, हेच पथ्य तर पाळू या
नको भीतीची मुळी भावना, तळहातावर घेऊ प्राण
कुंभकर्ण दिल्लीत झोपला, उडवू त्याची दाणादाण
इंद्रजीतही मुजोर झाला, त्याला 'चौदावे रत्न'
अवघड काही मुळीच नाही, एकवटू निष्ठा यत्न
कुणा हवी सोन्याची लंका, हवे सुखाचे क्षण
धुंदी चढली खुर्चीला मग, चला दाखवू आपली धार
आपण सारे वानरसेना, एकच जपू या मंत्र मनी
मालक आम्ही या देशाचे, या मातीचे आम्ही धनी
रोज पळविली जाते सीता, रोज नवे मायावी रूप
मुकी-आंधळी-बहिरी सत्ता, त्रस्त झाली जनता खूप
अत्त्याचारी सत्ताधारी, शेवटची हि असेल 'शाही'
समूळ उच्चाटन ते करू या, नकोच नामोनिशाण काही
हातावरती हात ठेवुनी, गप्पच बसलो आपण आज
येणारी ती पिढी विचारील , 'तुम्हास नव्हती काही लाज?"
लोकलढा हा लोकांसाठी , समजावे मग हेच निमंत्रण
वाट कशाला कुणी पहावी, येईल माझ्या घरी आमंत्रण
राम-कृष्ण जर अंगामध्ये, हवे कशाला उसने बळ
शंकर होऊनी उघडू डोळा, भेकड सत्ता काढील पळ
- जीवन मुर्गे
लातूर