कळंब -: येथे आरक्षण कृती समितीतर्फे भव्‍य मराठा आरक्षण इशारा परिषदेचे आयोजन करण्‍यात आले आहे. या परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले हे आहेत. मराठा आरक्षण इशारा परिषद हा कार्यक्रम रविवार दि. 20 ऑक्‍टोबर रोजी येथील साई मंगल कार्यालयात होणार आहे.
    महाराष्‍ट्रभर गाजत असणारा मराठा आरक्षण हा मुद्दा पुन्‍हा एकदा कळंब येथे जोर धरणार आहे. यावेळी आ. राहुल मोटे, बी.बी. ठोंबरे, सुधीर पायाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे स्‍वागताध्‍यक्ष म्‍हणून ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज हे राहणार आहेत. या इशारा परिषदेला अनेक सामाजिक संघटना, विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शविला आहे. युवराज छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्‍या मार्गदर्शनाखाली होणा-या या आरक्षण इशारा परिषदेमध्‍ये युवक, नागरीक, मराठा समाज यांनी लाखोंच्‍या संख्‍येनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन मराठा आरक्षण कृती समिती तर्फे अध्‍यक्ष गोपाळ चौंदे, संतोष कदम, सागर बाराते, दिनेश यादव, अँड. शहाजी कापसे, सचिन काळे यांनी केले आहे. 
 
Top