![]() |
महालोकअदालतीचे उदघाटन करताना |
पांगरी (गणेश गोडसे) -: ग्रामपंचायत कार्यालय पांगरी, बँक ऑफ इंडीया व तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पांगरी ता.बार्शी येथे आयोजित कोर्ट आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत पार पडलेल्या फिरत्या महालोकअदालतीत 100 च्या पुढे प्रकरणे दाखल झाली होती.यावेळी 40 लाख रूपयांचे दावे निकाली काढण्यात आले.
या मोफत कायदेविषयक शिबिराच्या अध्यक्षस्थानी बार्शी न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती व्ही.बी.मुल्ला हे होते. यावेळी बार्शी पंचायत समितीच्या सभापती सौ. कौशल्या माळी, उपसभापती केशव घोगरे, पांगरी पोलिस ठाण्याचे स.पो.नि. शरद मेमाने, सरपंच रामा लाडे, उपसरपंच भारत वाकडे, तंटामुक्ती अध्यक्ष सुहास देशमुख, बँक ऑफ इंडीयाचे विभागीय अधिकारी डोइजड, गुप्ता महादेव माळी, विस्तार अधिकारी विष्णु कशाळे, माजी सरपंच जयंत पाटील, विजय गोडसे सतिश जाधव, अमृत आरोळे, अकिल बागवान, विष्णु पवार, ग्रामविकास अधिकारी वैभव माळकर, कारीचे विजयसिंह विधाते, अँड. अनिल पाटील, वकिल संघाचे अध्यक्ष प्रविण करंजकर, अँड. अनिल शिंदे, बी.डी. पाटील, नंदकुमार सुतार, रियाज बागवान, दत्तात्रय मुंढे, हनुमंत लाडे, अमर गुरव, शंकर कांबळे यांच्यासह पांगरी परिसरामधील अनेक गांवामधील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
आपल्या गावी आलेल्या न्यायालय आपल्या दारी या सर्वोच्च न्यायालयाच्या संकल्पनेतुन सुरू करण्यात आलेल्या उपक्रमाचा लाभ घेऊन आपले न्यायालयातील जुने तंटे निकाली काढुन घेऊन पैसा व वेळ वाचवावा असे प्रतिपादन बार्शी न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती व्ही बी मुल्ला यांनी पांगरी येथील लोकअदालतीमध्ये केले. महात्मा गांधी प्रतिमा पुजनाने व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. पांगरीत फिरत्या लोक न्यायालयाची व्हॅन आल्यानंतर न्यायाधिशांसह इतर न्यायालयीन कर्मचा-यांचे ग्रामस्थांतर्फे स्वागत करण्यात आले.
पंचायत समितीच्या सभापती कौशल्या माळी यांनी यावेळी न्यायालय आपल्या दारी या योजनेचे कौतुक करून बार्शी तालुक्यातील 138 गावांमधील जनतेसाठी मंजुर झालेल्या निर्मल भारत अभियान योनचेची यावेळी माहिती दिली.
क ऑफ ईंडीयाचे झोनल मॅनेजर डोइजड यांनी यावेळी बँकेच्या विविध योजनांची माहिती देऊन शेतीची प्रगती झाली तर शेतक-याची प्रगती होईल, शेतक-यांची प्रगती झाली तरच देशाची प्रगती होईल असे सांगुन कर्जफेड करून दावे दाखल करण्याची प्रकिया टाळावी असे सांगितले.
अँड. अनिल पाटील यांनी प्रास्ताविकात न्यायदानात होत असलेले बदल सांगुन तालुका जिल्हस्तरावर न्याय मागण्यासाठी खर्च होणारा जनतेचा बहुमुल्य असा वेळ व आर्थिक हानी याची बचत होणार असुन सामंजस्याने दावा निकाली निघाल्यास वैमनस्यही संपते असे सांगुन न्यायालयाच्या दाव्याची फि सुदधा वाचते असे म्हणाले. सुत्रसंचालन अँड. पद्माकर काटमोरे यांनी तर आभार प्रविण करंजकर यांनी मानले.