तुळजापूर : तामलवाडी (ता. तुळजापुर) शिवारात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या एका वयोवृध्दास म्हशीने शिंगाने मारल्याने त्यात जखमी होवून जागीच मृत्यू झाल्याची घटना सोमवार दि. 22 ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली.
महादेव कुंडलीक कदम (वय 70 वर्षे, रा. तामलवाडी, ता. तुळजापूर) असे मृत्यमुखी पडलेल्या गुराख्याचे नाव आहे. महादेव हे स्वत:च्या म्हशी घेवून चारण्यासाठी तामलवाडी शिवारातील तुषार इंडस्ट्रीज कारखान्याजवळच्या शेतामध्ये रविवारी सकाळी गेले होते. दुपारी म्हशीने महादेव कदम यांना शिंगाने जबर मारहाण केली. यात गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी चारण्यास गेलेल्या म्हशी घरी परतल्या पण महादेव कदम हे घराकडे आले नाहीत. त्यानंतर नातेवाईकांनी रात्रभर शोधाशोध केली. सोमवारी सकाळी सहा वाजता कारखान्याच्या बाजुला शेतात महादेव कदम यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत मयताचा मुलगा राम महादेव कदम यांनी तामलवाडी पोलिसात खबर दिल्यावरुन याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास हवालदार शिंदे हे करीत आहेत.