उमरगा : भरधाव ट्रकने मोटारसायकलस्वारास जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील उमरगा शहरातील राजधानी पेट्रोलपंपासमोर सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली.
चंद्रकांत भुजंगराव भोसले (वय 55 वर्षे, रा. उमरगा) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नाव आहे. यातील चंद्रकांत भोसले हे मोटारसायकलवरुन (क्रं. एम.एच. 25 व्ही. 1966) जात असताना सोमवारी दुपारी साडेचार वाजण्याची त्यांची दुचाकी राष्ट्रीय महामार्ग क्र.९ वरील राजधानी पेट्रोलपंपासमोर आली. त्यावेळी समोरुन येणार्या ट्रकने (ए.पी. 0९/वाय.२५७0) दुचाकीला जोराची धडक दिली. झालेल्या अपघातात चंद्रकांत भोसले यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संभाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदरील ट्रकचालकाविरुद्ध उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.