उस्मानाबाद : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून याची दखल घेऊन तात्काळ महामार्ग रस्ता दुरुस्त न केल्यास याप्रकरणी आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे आमदार ओमप्रकाश राजेनिंबाळक यांनी महामार्ग विभागाच्या अभियंत्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद-कळंब मतदार संघातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. यावरून वाहन चालवणे धोकादायक बनले असून हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी मतदार संघातील नागरिकांमधून होत आहे. यामार्गावर वाहतुकीची मोठय़ा प्रमाणात वर्दळ असल्याने खराब रस्त्यामुळे दररोज लहान-मोठे अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे. याची दखल घेऊन तत्काळ हा महामार्ग दुरूस्त करावा, अन्यथा याप्रकरणी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार ओमराजे यांनी दिला आहे.