मुंबई : ९४ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन भरवण्याचा मान अखेर पंढरपूरला मिळाला आहे. मुंबईत सोमवारी झालेल्या नाट्य परिषदेच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच १ व २ फेब्रुवारी रोजी हे नाट्य संमेलन पार पडणार असून या वेळी पंढरपूरच्या इंद्रायणी नदीकाठी नाट्यकर्मींची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. गेल्या वर्षीचे ९३ वे नाट्य संमेलन बारामतीत आयोजित करण्यात आले होते. यंदा संमेलन आयोजनाचा मान नेमका कोणाला मिळतो? याकडे राज्याच्या नाट्य क्षेत्रातील सर्वच कलाकारांचे लक्ष लागले होते. संमेलनाच्या ठिकाण निश्चितीसाठी सोमवारी दुपारी मुंबईत नाट्य परिषदेची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला नाट्य परिषदेच्या कार्यकारिणीतील सर्व सदस्य उपस्थित होते. चालू वर्षी पंढरपूरसह नागपूर, सातारा या तीन शाखांनी संमेलन आयोजनाची तयारी दर्शवली होती.
तिन्ही शाखांच्या निमंत्रणाचा स्वीकार करत नाट्य संमेलनाच्या कार्यकारिणीने त्या-त्या ठिकाणी जाऊन पाहणीदेखील केली होती. या पाहणीअंती ठिकाण निश्चित करण्याचे ठरवून सोमवारी मुंबईत कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली होती. बैठकीत यंदाचे नाट्य संमेलन विठूरायाच्या पंढरीत भरवण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ रंगकर्मी अरुण काकडे यांच्या नावाची अलीकडेच घोषणा करण्यात आली आहे. ३१ जानेवारी रोजी संमेलनाच्या पूर्वसंध्येचा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी दिली.