बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) -: येथील भगवंत सहकारी पुरवठा मंडळी या कोटयावधी रुपयांची उलाढाल असलेल्या नामांकित संस्थेतील कर्मचारी बिपीन नाईकवाडी यांनी संस्थांतर्गत कलह तसेच होणा-या मानसिक त्रासातून चार दिवसांपूर्वी केलेल्या आत्महत्येची सखोल चौकशी व्हावी तसेच डायरेक्टर असलेल्या आंधळे यांच्यावरच आरोपाचा सूर वार्षिक सर्वसाधारण सभेत निघाला.
भगवंत सहकारीतील कर्मचारी बिपीन नाईकवाडी यांनी विषारी औषध प्राशन करुन केलेल्या आत्महत्ेयची बार्शी पोलिसांत किरकोळ नोंद आहे. परंतु अदयापपर्यंत कोणीही लेखी तक्रार न केल्याने तसेच बार्शी पोलिसांना त्यांच्या आत्महत्येत सोयरसुतक नसल्याचे दिसून आल्याने बार्शी पोलिसांविरूद्ध संपूर्ण बार्शीत प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ढगे मळा येथील मातृमंदिरात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी डॉ.बी.वाय.यादव हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस नाईकवाडी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. संस्थच्या ताळेबंद व अहवालाचे वाचन झाल्यानंतर चार दिवसांपूर्वी दुर्दैवी मृत्यू झालेल्या बिपीन नाईकवाडी यांना संस्थेतील ज्यांच्याकडून मानसिक त्रास, छळ, पिळवणूक व आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, सखोल चौकशी व्हावी, दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी अनेकांनी केली. यावेळी अनेकांच्या भावना अनावर झाल्या.
भावना व्यक्त करताना सभासदांनी बोलताना म्हणाले, संस्थेच्या वैभवशाली परंपरेत नाईकवाडी यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू हा त्यांना झालेल्या हॅरेशमेंटमुळेच आहे, त्यामुळेच ब्राह्मण म्हणून जन्म घ्यायला आज लाज वाटत आहे. याची थातुरमातुच चौकशी नको, महात्मा गांधीच्या नावाने जसे काही जण जगात तशाप्रकारे तात्यासाहेब देशमुख व बिपीन नाईकवाडी यांच्या मृत्यूचे भांडवल करुन जगणा-यांना थारा देऊ नये.