नळदुर्ग - श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन चिरंजीव सुनीलराव चव्हाण यांचे अणदूर (ता. तुळजापूर)येथील बसस्थानकासमोर असलेले कार्यालय फोडून अज्ञात चोरट्यांनी त्यांचा लॅपटॉप लंपास केला. तर दुस-या घटनेत पशुवैद्यकीय अधिकारी कृष्णा चंद्रकांत रेड्डी यांचे घर फोडून दहा हजार रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा दोन्ही घटनेतील एकूण 42 हजार रुपयाचा ऐवज चोरटयानी लंपास केला.
सोलापूर- हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील अणदूर (ता. तुळजापूर) येथील एसटी बसस्थानकासमोर असलेल्या मधुशाली नगरात रविवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गालगत पालकमंत्री मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव सुनील चव्हाण यांचे कार्यालय आहे. सदर कार्यालयाच्या शटरचे कुलूप तोडले. आत प्रवेश करुन चोरट्यांनी त्या ठिकाणी असलेला लॅपटॉप चोरट्यांनी लंपास केला. याचवेळी चोरट्यांनी शेजारीच असलेल्या पशुवैद्यकीय अधिकारी कृष्णा चंद्रकांत रेड्डी यांचे घर फोडले. कपाटातील रोख रक्कम दहा हजार व सोन्याचे दागिने असा दोन्ही घटनेतील एकूण ४२ हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची फिर्याद कृष्णा रेड्डी यांनी दिली आहे. त्यावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोउपनि मुबारक शेख हे करीत आहेत.
चोरटे कारमधून पसार
रविवारी रात्री मधुशाली नगरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरु असताना काही नागरिक जागे झाले. सदर घटनेची माहिती मिळताच रात्री गस्तवर असलेले नळदुर्ग ठाण्याचे पोउपनि मुबारक शेख यांच्या पथकाने घटनास्थळाकडे धाव घेतली. जागे होणारे नागरिक व पोलिसांच्या जीपचा आवाज ऐकून चोरट्यांनी कारमधून पळ काढला. यावेळी पोलिस जीपने त्यांचा पाठलागही केला. मात्र चोरटे हाताला लागले नाहीत.
वाहनाच्या नंबरवरुन लागला तपास
पाठलाग करत असताना पोउपनि शेख यांनी कारचा नंबर (एम. एच. १३/ए. झेड. ८९0९) घेतल्याने सोमवारी नंबरवरुन शोध घेण्यात आला. त्यावेळी सदर कार ही सोलापूर जिल्ह्यातील मार्डी येथील प्रवीण सरडे याची असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन सोमवारी दुपारी मार्डीमध्ये प्रवीण सरडे यास तर पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर येथे शिवाजी काळे यास अटक करण्यात आली. सदर दोघांकडून एक दुचाकी, एक कार, चोरीतील लॅपटॉप, चार हजार रुपये रोख व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यातील अन्य दोघे अद्याप फरार असून त्यांचा तपास सुरु आहे. १२ तासात पोलिसांनी चोरटे व मुद्देमाल ताब्यात घेतला असला तरी तरी पालकमंत्र्यांच्या मुलाचे कार्यालय फोडण्याचे धाडस केले जात असल्याने सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.