आपल्‍याला सोन्‍याने मढवलेला मोबाईल फोन खरेदी करण्‍याची इच्‍छा आहे ? त्‍यासाठी आपल्‍याला 1.6 कोटी डॉलर्सपर्यंतची किंमत द्यावी लागेल. अशाच काही महागड्या मोबाईल फोनची ही माहिती...

गोल्‍डस्‍टीकर आयफोन 3 जीएस सुप्रीम

या फोनची किंमत तब्‍बल 30.2 लाख डॉलर्स इतकी आहे. स्‍टुअर्ट ह्युजेसच्‍या या शाही गॅझेटमध्‍ये 271 ग्रॅमचे शुध्‍द 22 कॅरेट सोने जडवलेले आहे. तसेच दोनशे पेक्षाही अधिक हि-यांनी हा मोबाईल सजवलेला आहे. 53 रत्‍नांनी सजवलेला अँपलचा लोगो त्‍याच्‍या मागे आहे. फ्रंट पॅनेलवरील होम बटन 7.1 कॅरेटच्‍या हि-याने बनवलेले आहे.
स्‍टुअर्स ह्युजेस आयफोन 5 ब्‍लॅक डायमंड
याची किंमत 1.6 कोटी डॉलर्स इतकी आहे. त्‍यामध्‍ये 135 ग्रॅमचे 24 कॅरेट सोने आहे. स्‍क्रीन ग्‍लासवर नीलम असून नेव्‍हीगेशन बटणावर 26 कॅरेटचा डीप कट हिरा आहे. या आयफोन 5 वर सहाशे सफेद हिरे जडवलेले आहेत. फोनच्‍या मागे सोन्‍याचा लोगो असून त्‍यावर 53 हिरे आहेत.
स्‍टुअर्ट ह्युजेस आयफोन 4 एस एलिट गोल्‍ड
याची किंमत 1.27 कोटी डॉलर्स आहे. यामध्‍येही 24 कॅरेटचे सोने आणि ब्‍लॅक पॅनल आहे. नेव्‍हीगेशन बटणावर गुलाबाच्‍या आकारात सोने जडवले आहे. फोनवर 500 हिरे जडवलेले आहे. लोगोवर 53 हिरे आणि नेव्‍हीगेशन बटणावर 8.6 कॅरेटचा हिरा बसवला आहे.
स्‍टुअर्स ह्युजेस आयफोन 4 डायमंड रोज
याची किंमत 80 लाख डॉलर्स इतकी आहे. 32 जीबी मेमरीच्‍या या आयफोनमध्‍ये अँपलचा लोगो 53 हि-यांनी सजवलेला आहे. याशिवाय एकूण शंभर कॅरेटचे 500 हिरे यावर जडवलेले आहे. त्‍याच्‍या प्‍लॅटिनम नेव्‍हीगेशन बटणावर 7.4 कॅरेटचा गुलाबी हिरा आहे.
 
Top