नवी दिल्ली : जर्मनीतील संशोधकांनी प्रति सेकंद 100 जीबी डेटा प्रक्षेपित होईल, यासाठी वायरलेस नेटवर्कद्वारे एक नवे डिव्हाईस विकसित केले आहे. म्हणजेच त्याद्वारे 20 मीटर अंतरावर असलेल्या दोन कॉम्प्युटरमध्ये एका सेकंदात 12 ते 15 चित्रपट एकातून दुस-यात पाठविणे शक्य होणार आहे.
मिल्लिलिंक या 2010 पासुन सुरु असलेल्या प्रकल्पांतर्गत कार्सरुह इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलॉजी येथे हा प्रयोग करण्यात आला. जलद इंटरनेट सुविधेसाठी ब्रॉडबँड ऑप्टिकल कम्युनिकेशन नेटवर्क्समध्ये वायरलेस किंवा रेडिओ यांच्यातील लागेबांधे संकलित करणे, हा या प्रयोगाचा मुख्य उद्देश होता. या प्रयोगासाठी फोटॉनिक आणि इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजीचा एकत्रित वापर करण्यात आला होता. प्रामुख्याने ग्रामीण भागात ऑप्टिकल फायबर नेटवर्कला पर्याय म्हणून हे तंत्रज्ञान कमी खर्चात आणि लवचिक ठरणार आहे, अशी माहिती मिल्लिलिंक या प्रकल्पाचे प्रमुख प्रा. इंमार कालफास यांनी दिली.
भारतातील इंटरनेटचा सरासरी स्पीड पाहता मार्चमध्ये असलेल्या 1.3 एमबी प्रति सेकंद स्पीडच्या तुलनेत जुनमध्ये त्यात 6.8 टक्क्यांनी वाढ झाली असली तरी आशिया पॅसिफिक क्षेत्रातील देशांमध्ये भारतातील इंटरनेटचा स्पीड सर्वांत कमी असल्याने अँक्माय टेक्नॉलॉजीने आपल्या अहवालात म्हटले आहे.