नळदुर्ग : आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, याची जाणीव ठेवून सामाजिक बांधिलकीने समाज कार्यात सक्रिय राहून आपल्‍या कार्यातून आपली ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन रिपाइंचे तुळजापूर तालुकाध्‍यक्ष एस.के. गायकवाड यांनी नळदुर्ग येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.
    रिपाइंचे उस्‍मानाबाद जिल्‍हा सरचिटणीस तानाजी कदम यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त नळदुर्ग येथे विविध पक्ष व संघटनेच्‍या कार्यकर्त्‍यांच्‍यावतीने अभिष्‍टचिंतनाच्‍या कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी अध्‍यक्षीय स्‍थानावरुन एस.के. गायकवाड हे बोलत होते. पुढे बोलातना ते म्‍हणाले की, व्‍यक्‍तीपेक्षा समाज मोठा असून समाजातल्‍या सामान्‍य माणसाला न्‍याय देण्‍याचा प्रयत्‍न कार्यकर्त्‍यांनी केला पाहिजे.
    यावेळी प्रमुख पाहुणे म्‍हणून सहशिक्षक भैरवनाथ कानडे, रिपाइंचे तुळजापूर शहराध्‍यक्ष अरुण कदम, तालुका संघटक विलास गायकवाड, गुरु रविदास क्रांती दलाचे सोमनाथ बनसोडे आदींची शुभेच्‍छापर भाषणे झाली. याप्रसंगी रिपाइंसह सावली बचत गट, रिपाइं-बंजारा आघाडी, भारतीय बौध्‍द महासभा, गुरु रविदास का्रंती दल यासह विविध पक्ष व संघटनेच्‍यावतीने रिपाइंचे जिल्‍हा सरचिटणीस तानाजी यांचा फेटा, पुष्‍पहार, पुष्‍पगुच्‍छ देवून पेढा भरवून यथोचित सत्‍कार करण्‍यात आला.
    या कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक रिपाइं युवा आघाडीचे तालुकाध्‍यक्ष अरुण लोखंडे यांनी तर सुत्रसंचालन शहराध्‍यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केले. तर आभार दयानंद काळुंके यांनी मानले. यावेळी रिपाइं विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्‍यक्ष शुभम कदम, रिपाइं बंजारा आघाडीचे आनंद चव्‍हाण, रामस्‍वामी वाघमारे, बाळू गायकवाड सह कार्यकर्ते मोठया संख्‍येनी उपस्थित होते.
 
Top