उस्मानाबाद - वाशी तालुक्यातील हातोला पाझर तलावात भ्रष्टाचाराचा आरोप करुन मनसेच्या कार्यकर्त्यांनी दि. 9 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिका-यांची गाडी फोडून जिल्हाधिकारी व पाटबंधारे कार्यालयात धुडगूस घालणा-या मनसेच्या आठही कार्यकर्त्यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे सुनावण्यात आले आहे.
सचिन इंगोले ( मनसे वाशी तालुकाप्रमुख), राजेंद्र गपाट, सुरेश भराटे, रमेश सुकाळे, केशव बहिर, आण्णासाहेब गव्हाणे, मोहन इंगोले, अमोल भांड असे न्यायायलीन कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत. वाशी तालुक्यातील हातोला पाझर तलावात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून,मनसेच्या कार्यकर्त्यांनी दि.९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिका-यांची गाडी फोडली होती तसेच जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयाची काच फोडून पाटबंधारे कार्यालय जाळण्याचा प्रयत्न केला होता,तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्तासाठी ठेवण्यात आलेल्या पोलिसांवर जीवघेणा हल्ला केला होता. याप्रकरणी वरील आठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरूध्द विविध कलमे लावण्यात आली आहेत,तसेच ३०७ हे कलमही लावण्यात आले आहे.त्यांना शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी होती,पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने आता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची रवानगी उस्मानाबाद जिल्हा न्यायालयात करण्यात आली आहे.