पांगरी (गणेश गोडसे) : खब-यामार्फत मिळालेल्या माहितीवरून पांगरी पोलिस ठाण्यासमोर टेम्पो आडवुन त्याची तपासणी केली असता त्यात वाहनांच्या तीन चेसीज मिळुन आल्याची घटना पांगरी (ता.बार्शी) येथे घडली असुन पांगरी पोलिसांनी आयशर कंपनीचा टेम्पो ताब्यात घेतला आहे.
यासंदर्भात प्राप्त माहिती अशी की, पुणे येथुन लातुरकडे तिन चेसी घेऊन निघालेल्या आयशर टेम्पोची पांगरी पोलिसांनी रात्रगस्त चालु असताना व त्यांना बातमीदारांकडुन मिळालेल्या माहितीवरून तपासणी केली असता त्यांनी चालकाकडे चेसीसंदर्भात चौकशी केली. चालकाने कळंबोली येथुन चेसी घेऊन आपन लातुरकडे भाडयाने जात असल्याचे सांगितले. चेसीसंदर्भात अधिक माहिती टम्पो चालकाला देता आली नाही. सदर चेसी आपन लातुर येथील शेख याच्याकडे घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावल्याने व त्यांना संशयास्पद वाटल्याने त्यांनी सदर टेम्पो चेसींसह आपल्या ताब्यात घेतला आहे. यामुळे अनेक प्रकरणांच्या तपासाला गती मिळेल असा पोलिसांचा कयास आहे़.
पांगरी पोलिसांनी ताब्यात घेतल्या या टेम्पोतील चेसींचा संबंध तुपारी वसाहत ता.पलुस जि.सांगली या घटनेशी आहे का याचा पोलिस कसुन शोध घेत आहेत. सांगली जिल्हयात सध्या गाजत असलेल्या ट्रक टेम्पो यासह विविध वाहनांच्या सुटया भांगाच्या तपासाच्या दृष्टीनेही सदर टेम्पोचालकांकडे सखोल चौकशी करून माहिती घेतली जात आहे. टेम्पो पांगरी पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे खळबळ उडाली आहे. पांगरी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम शनिवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते.