तुळजापूर : विवाहित महिलेस सासरच्‍यांनी संगनमत करुन तुझ्या आईला (मुलगा) वारस नाही, तिचे नावावरील जमीन तुझ्या हिस्‍याप्रमाणे तुझे नावावर करुन घे, म्‍हणून सतत मारहाण, भांडणतक्रार करुन जाचजुलम करत असल्‍याने त्‍या त्रासास कंटाळून विवाहितेने आत्‍महत्‍या केल्‍याप्रकरणी सासरच्‍या पाच जणांविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.
    उषाबाई विठ्ठल सोनटक्‍के (वय 24 वर्षे, रा. गंधोरा, तुळजापूर) असे आत्‍महत्‍या केलेल्‍या विवाहितेचे नाव आहे. तर विठ्ठल आगतराव सोनटक्‍के, वच्‍छलाबाई आगतराव सोनटक्‍के, आगतराव सिद्राम सोनटक्‍के, लिंबाजी उर्फ नाना आगतराव सोनटक्‍के, रुक्‍मीनबाई आगतराव सोनटक्‍के (सर्व रा. गंधोरा, तुळजापूर) असे गुन्‍हा दाखल झालेल्‍यांचे नाव आहे. यातील विवाहित महिला उषाबाई यास वरील सासरच्‍या मंडळींकडून सतत मारहाण करुन माहेरकडील शेतजमीन नावावर करुन घे, म्हणून छळ केला जात आहे. त्‍यास कंटाळून उषाबाई हिने दि. 13 ऑक्‍टोबर रोजी गंधोरा येथे रात्री अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतली होती. त्‍यात ती भाजून गंभीर जखमी होऊन उपचारादरम्‍यान तिचा मृत्‍यू झाला. याप्रकरणी मयतची आई कस्‍तुरबाई अंबादास भंडारे (रा. चौगुलेवस्‍ती, उमरगा) यांनी नळदुर्ग पोलिसांत फिर्याद दिल्‍यावरुन वरील पाचजणांविरूद्ध गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करीत आहेत.
 
Top