सातारा : राष्‍ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत 22 जागा लढवणार असल्‍याचे वक्‍तव्‍य राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री ना. अजित पवार यांनी सातारा येथे आयोजित राष्‍ट्रवादीच्‍या मेळाव्‍यात बोलताना केले.
    गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस राष्ट्रवादीत कुणी किती जागा लढवायच्या यावरून वाद सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर अजित पवारांचं वक्तव्य महत्वाचं मानलं जात आहे.
    यापूर्वी  काँग्रेसनं लोकसभेच्या २९ जागांवर हक्क सांगितला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नागपुरात याबाबतची माहिती दिली होती.
    राष्ट्रवादी काँग्रेसला २००४ मध्ये विधानसभेत जास्त जागा मिळाल्या. त्यामुळं २००९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीनं लोकसभेच्या जास्तीच्या जागांवर हक्क सांगितला. आता त्याच न्यायानं काँग्रेसलाही 29 जागा मिळायला हव्यात, असं माणिकारांवांनी नागपुरात म्हटलं होतं. त्यामुळे आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जागा वाटपावरून पुन्हा ताणाताणी सुरू होण्याची शक्यता आहे.
 
Top