औरंगाबाद (उमेश टोंपे) -: महाराष्‍ट्र विधान मंडळाच्‍या विद्यमाने माजी मुख्‍यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते स्‍वर्गीय वसंतरावजी नाईक यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त रविवार दि. 27 ऑक्‍टोबर रोजी औरंगाबाद येथे भव्‍य प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. हे प्रदर्शन तीन दिवसीय आहे.
    वसंतरावजी नाईक यांच्‍या जीवनकार्याची माहिती देण्‍या-या प्रदर्शनाचे आयोजन
करण्‍यात आले असून औरंगाबाद येथील सिडकोच्‍या जगदगुरु संत तुकाराम महाराज नाट्य मंदीर येथे रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांच्‍या हस्‍ते उदघाटन होत आहे. प्रमुख पाहुणे म्‍हणून विधान परिषदेचे सभापती ना. शिवाजीराव देशमुख, विधानसभा अध्‍यक्ष ना. दिलीप वळसेपाटील, उपमुख्‍यमंत्री अजित पवार, महसुलमंत्री तथा पालकमंत्री बाळासाहे‍ब थोरात, शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे (पाटील), सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री जयदत्‍त क्षिरसागर, उच्‍च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, महिला व बालकल्याण मंत्री वर्षा गायकवाड, पशुसंवर्धन, दुग्‍धविकास व मत्‍स्‍यव्‍यवसाय मंत्री ना. मधुकरराव चव्‍हाण, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, विधानसभेचे उपाध्‍यक्ष वसंत पुरके, सामान्‍य प्रशासन, माहिती व जनसंपर्क, सांस्‍कृतिक कार्य मंत्री श्रीमती फौजिया खान, गृह, ग्रामविकास, अन्न व औषध प्रशासन राज्‍यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, महसुल व सहकार राज्‍यमंत्री सुरेश धस आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
    हे प्रदर्शन दि. 28 व 29 ऑक्‍टोबर रोजी सकाळी दहा ते रात्री साडे सात वाजेपर्यंत खुले राहणार आहे.
 
Top