बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : सोलापूर आरटीओ अधिकार्यांच्या एका पथकाकडून बार्शी शहरातील वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी बेकायदा ३० अँटोरिक्षा वाहनांवर कारवाई करण्यात आली. गुरुवार दि. 24 ऑक्टोबर रोजी दुपारी दिडच्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. वाहतूक पोलिस निरीक्षक राजेंद्र आर.पाटोळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली, वाहतुक पोलीस निरीक्षक नरगुंदे, नांदगांवकर, मालुसरे, प्रमोद महाडिक व सहकारी यांचे हे पथक होते. बार्शी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक यु.एस.वाळके, वाहतूक पोलिसांचे पथक यांनी वाहनांची तपासणी करुन वाहने ताब्यात घेतले. बेकायदा चोरटी वाहतूक करणे, विना परमीटचे वाहने चालविणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, इलेक्टॉनिक्स मीटर नसणे आदी प्रक़ारच्या वाहनांवर कारवाई करण्यात आली.
यावेळी बोलतांना वाहतूक पोलीस निरीक्षक आर.आर. पाटोळे म्हणाले, बार्शी अ वर्ग नगरपालिका आहे. शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदा स्कॅप रिक्षा वाहने असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अशा प्रकारची बेकायदा वाहने चालू ठेवणे धोकादायक आहे. सोलापूर येथे १४ जुलैपर्यंत केवळ १ टक्के वाहनांना इलेक्टॉनिक मीटर बसविल्याचे आढळले होते. परंतु मागील दिड महिन्यांत केलेल्या कारवाईमुळे ७० टक्के अँटो रिक्षा वाहनांना मीटर बसविल्याचे दिसून येत आहे. बार्शी शहरात वाहतूक पोलिस निरीक्षकांचे पथक दाखल झाल्याची वार्ता रिक्षा चालकांत वार्याच्या वेगाने पसरली. वाहन चालकांनी मोठ्या चलाखीने खुश्कीच्या मार्गाने आपल्या रिक्षा वेगाने पळवून आडबाजूला नेल्या. बस स्थानकासमोर वाहनांच्या जाण्या-येण्याच्या मार्गावर अडथळा करत बसचालकांच्या नाकावर टिच्चून लावण्यात येणार्या रिक्षा काही मिनीटांतच दिसेनाश्या झाल्या होत्या. रिक्षाचालकांकडून नियमितपणे प्रवाशांची लूट होत असून त्यांच्यावर कोणतेही बंधन नसल्याचे दिसून येते. व्यापार्यांच्या दुकानासमोर तसेच मध्यवस्तीमध्येही गर्दीच्या ठिकाणी तासनतास वाहने लावून रिक्षाचालक मनमानी करत असल्याचे दिसून येते. वृध्द, दवाखान्यास उपचारासाठी जाणार्या पेशंट इत्यादींना अडवणूक करुन जादा रक्कम घेत असल्याचेही अनेक वेळा दिसून येते.