ताज्या घडामोडी

उस्मानाबाद :- राज्यात दरवर्षीप्रमाणे सरदार वल्लभाई पटेल यांच्या 31 ऑक्टोबर या जन्मदिनापासून एक आठवडा दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हा सप्ताह दि. 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर,2013 या कालावधीत राबविण्यात येणार असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक एन. एच. हाश्मी यांनी दिली आहे.
            सोमवार, दि.28    ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता सर्व शासकीय कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेण्यात येईल. त्यानंतर राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री  यांनी या सप्ताहानिमित्त दिलेल्या संदेशाचे वाचन होईल. शासकीय कार्यालयासह राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था, स्वायत्त्त संस्थांमार्फतही सप्ताहाचे आयोजन करण्यात येणापर आहे.
             या सप्ताहात कार्यालये, शाळा, महाविद्यालयात भ्रष्टाचाराच्या दुष्परिणांमावर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने , निंबध स्पर्धा, कार्यशाळा आदिचे आयोजन करावे, यशस्वी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पारितोषिके देवून गौरवण्यात यावे,असे आवाहन करण्यात आले आहे.
            भ्रष्टाचारासंबधित काही तक्रार असल्यास स्थानिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा. तसेच www.acbmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर आणि 1800222021 या निशुल्क दुरध्वनी क्रमांकावर संपर्क  साधण्याचे आवाहनही  श्री. हाश्मी यांनी केले आहे.
 
Top