उस्मानाबाद :- सन 2013-14 मध्ये जिल्ह्यातील अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालये/कनिष्ठ महाविद्यालयासाठी जिल्ह्यात इ.बी.सी प्रस्ताव तपासणी करुन घेता यावे, यासाठी खालील तारखेस कॅंम्प्सचे आयोजन करण्यात आले आहे. या तपासणीत शिक्षण उपसंचालक , लातूर यांनी दिलेल्या संच मान्यतेची झेरॉक्स प्रत, शिक्षणाधिकारी (मा.) जिल्हा परिषद यांनी 2013-14 मध्ये केलेल्या पटपडताळणी अहवालाची झेरॉक्स प्रत व विहीत नमुन्यातील प्रस्तावासह उपस्थित राहून ई. बी. सी.चे प्रस्ताव तपासून घ्यावेत, असे आवाहन डी. व्ही. सुळ, लेखाधिकारी (शिक्षण विभाग), उस्मानाबाद यांनी केले आहे.
तालुकानिहाय कॅम्पचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. दि.12 व 13 नोव्हेंबर -तुळजापूर तालुक्यासाठी महर्षी विठल रामजी शिंदे हायस्कुल, तुळजापूर, दि. 15 ते 16 उस्मानाबाद तालुक्यासाठी लेखाधिकारी शिक्षण, कार्यालय, उस्मानाबाद, दि 19 ते 20 - उमरगा तालुक्यासाठी भारत विद्यालय, उमरगा, दि.21-लोहारा तालुक्यासाठी वसंतदादा पाटील हायस्कुल, लोहारा, दि. 22- वाशी तालुक्यासाठी छत्रपती शिवाजी हायस्कुल, वाशी, दि. 26 ते 27 -कळंब तालुक्यासाठी सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय, कळंब, दि. 28- भूम तालुक्यासाठी शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भुम, आणि दि. 29 नोव्हेंबर रोजी परंडा तालुक्यासाठी प्रेरणा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, परंडा येथे आयोजन करण्यात आले आहे. संबधितानी याची नोंद घ्यावी, असेही कळविण्यात आले आहे.