न्‍यूयॉर्क : 'फेसबुक' चा संस्‍थापक मार्क झुकेरबर्ग याला जगातील सर्वाधिक पगार मिळतो. कंपनीने 2012 साली त्‍याला 2.3 अब्‍ज डॉलर्स एवढा पगार दिला आहे.
    'जीएमआय रेटिंग' या सर्वेक्षण कंपनीने अमेरिकेत सर्वाधिक पगार, भत्‍ते आणि इतर लाभ घेणा-या मुख्‍य कार्यकारी अधिका-यांची (सीईओ) यादी जाहिर केली आहे. 'जीएमआय रेटिंग' ने ही आकडेवारी या सीईओंना 2012 या एका वर्षात त्‍यांच्‍या कंपनीकडून मिळालेल्‍या उत्‍पन्‍नावरुन बनविण्‍यात आली आहे. 'जीएमआय रेटिंग' ने 2 हजार 200 सीईओबाबत माहिती घेतली असून त्‍यांची क्रमवारी निश्चित केली आहे. यामध्‍ये झुकरबर्ग अमेरिकेतील सर्वाधिक पगार घेणार मुख्‍य कार्यकारी अधिकारी ठरला आहे. अमेरिकेतील सीईओंनी 2012 या वर्षात एकत्रितपणे 4.7 अब्‍ज डॉलर्स रुपये आपल्‍या घरी नेले आहे. हे त्‍यांचं अधिकृत उत्‍पन्‍न आहे.
 
Top