सिएटल : मानवी सहजीवनामध्‍ये प्रेमाला अनन्‍यसाधारण असे महत्‍त्‍वाचे स्‍थान आहे. प्रेमाशिवाय जीवनाची कल्‍पनाही करता येणे शक्‍य नाही. एखादा माणूस जेंव्‍हा प्रेमात पडतो तेंव्‍हा त्‍याच्‍यामध्‍ये जसे काही मानसशास्‍त्रीय बदल होतात तसे भौतिक आणि शारीरिकदृष्‍टयाही तो आमुलाग्र बदलतो. हे आता वैज्ञानिक प्रयोगातून देखील स्‍पष्‍ट झाले आहे.
    आपल्‍या प्रेयसीसोबत फिरत असताना प्रियकराची चालण्‍याची गती ही सात टक्‍क्‍याने कमी होत असल्‍याचे संशोधनातून स्‍पष्‍ट झाले आहे. 'सिएटल पॅसिफीक' विद्यापीठात काम करणा-या कारा वॉल श्‍केफलर आणि त्‍यांच्‍या सहका-यांनी केलेल्‍या संशोधनातून ही अनोखी बाब समोर आली आहे. यासाठी संशोधकांनी आपल्‍या प्रेयसीसोबत बागेत फिरणा-या असंख्‍य प्रियकरांच्‍या चालण्‍याच्‍या गबतीचा अभ्‍यास केला होता. एरव्‍ही आपल्‍या मित्रासोबत चालताना मात्र अगदी गोगलगाय होऊन जातात. यामागे विविध मानसशासत्रीय कारणे असल्‍याचेदिसून आले आहे. याआधीही ब्रिटनमधील संशोधकांनी असेच संशोधन केले होते. तेंव्‍हा मात्र त्‍यातून फारसे समाधानकारक निष्‍कर्ष हाती आले नव्‍हते. या नव्‍या संशोधनामुळे मात्र प्रेमाचा 'सायकोलॉजिकल लोचा' संशोधकांना समजला आहे. तसेच त्‍याचे व्‍यक्‍तीच्‍या शरीराव देखील परिणाम होत असल्‍याचे सिध्‍द झाले आहे.
 
Top