प्रतिकात्‍मक फोटो
बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : बार्शी शहरात लावण्यात येणार्‍या डिजीटलवर कायदेशीरपणे त्याचा कालावधी, मुद्रकाचे नांव, जबाबदार व्यक्तीचे नांव, संपर्क क्रमांक, आकार इत्यादी मजकूर प्रसिध्द करण्याचे नांव, नगरपालिकेसोबत बार्शी पोलिसांची लेखी परवानगी यामध्ये मुद्रण करण्याच्या मजकूरास व छायाचित्रांना पूर्वपरवानगी घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.
    'उठला की सुटला काढ फोटो, काढ डिजीटल आणि लाव' यामुळे बार्शी शहराचे सौंदर्यही बिघडले असून स्वत:चे हेवेदावेही डिजीटलमार्फत काढण्यात येत असल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. प्रचंड प्रमाणात होणार्‍या जाहीरातबाजी व डिजीटल युध्दाचा परिणाम जातीय सलोख्यात तेढ निर्माण होणे, जातीय दंगल होणे, हिंसाचार होणे परिणामत: कायदा व सुव्यवस्थेची गंभीर समस्या निर्माण होते. त्याला प्रतिबंध करण्यासाठी चांगला उपाय म्हणून बार्शी पोलिसांनी डिजीटल फलक तयार करणार्‍यांची एक बैठक घेऊन त्यांना नोटीसा दिल्या असून स्थानिक प्रशासन अथवा नगरपालिका, बार्शी शहर पोलिस ठाणे यांच्याकडील परवानगी असल्याशिवाय डिजीटल तयार करुन देऊ नये, अशा लेखी सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत.  बार्शी शहरातील सर्व डिजीटल व्यावसायिकांनी बार्शी पोलिसांच्या सूचनेस मनापासून प्रतिसाद दिला असून बार्शी शहराव्यतिरिक्त इतर ठिकाणहून बनवून आणलेल्या डिजीटलवर देखिल याच नियमानुसार प्रसिध्दी बंधनकारक करण्यात आली असून बेकायदा डिजीटल लावणार्‍यांवर गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्यात येईल.
 
Top