बार्शी (मल्लिकार्जून धारुरकर) : व्यक्ति, परिस्थिती, प्रकृतीशी युध्दाऐवजी मिळते जुळेते घेतल्यास सुखाची प्राप्ती होते. संतुष्टता ही सर्व गुणांचा राजा आहे. इतरांना देण्याऐवजी घेण्याच्या अपेक्षेमुळे संतुष्टता हरवत चालली आहे. इतरांकडून सन्‍मान व स्नेहाची अपेक्षा करतांना ते इतरांना दिले पाहिजे, असे मत ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या क्षेत्रसंचालिका संतोषबहनजी यांनी व्यक्त केले.
    बार्शी येथील प्रजापिता ब्र.कु.सेवाकेंद्रातील मंगळवारी सायंकाळी आयोजित स्नेहमिलनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सोमप्रभाबहनजी, संगीताबहनजी,  माजी आमदार विनायकराव पाटील, युवक कॉंग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष विजय (नाना) राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
    पुढे बोलताना संतोषबहनजी म्‍हणाल्‍या, वेळ ही परिवर्तनशील आहे. दुःखाचे दिवस संपणारे व सुखाचे येणारे असल्‍याची खात्री पटते. आत्‍मचिंतनाने प्रभुचिंतन होते, त्‍यामुळेच जीवनात सुखशांती प्राप्‍त होते. स्‍वचिंतनाने सकारात्‍मक विचरांची निर्मिती होते. भटकणा-या बुध्‍दीला स्थिर करण्‍यासाठी याचा उपयोग होतो. कलियुग हे समस्‍येचे युग असले तरी त्‍या परिस्थितीत प्रेमाने त्‍याचा स्विकार करुन समाधानात परिवर्तन करता येते. समस्‍या ह्या मनोरंजनासाठी असल्‍याचे समजून घेतल्‍यास भिती नष्‍ट होईल. इंटरनेटसारख्‍या प्रभावी माध्यमाचा वापर करुन मनुष्‍य परदेशातील व्‍यक्‍तींशी विचारांची देवाणघेवाण करत असल्‍याचे दिसून येतांनाच आपल्‍या घरातील व्‍यक्‍तींशी सक्षमपणे बोलत नसल्‍याचेही दिसून येते. एकमेकांच्‍या ह्दयातील वाढलेले अंतर दूर करण्‍याचे सामर्थ्‍य अध्‍यात्‍मकातच आहे. इतरांना सुखी, समाधानी, संतुष्‍ट करण्‍याचा विचार केल्‍याशिवाय स्‍वतःला ते प्राप्‍त होत नाही. भौतिकवादी मनुष्‍याला सुखसुविधेची साधने उपलब्‍ध असतानाही त्‍याचा अनुभव करता येत नाही, कारण शांतीचे मूळ असलेल्‍या परमात्‍माला संतुष्‍टता व असंतुष्‍टेचे कारण आहे. सुष्‍टीच्‍या रंगमंचावर कधीही न संपणारे नाटक सुरु आहे. यामध्‍ये प्रत्‍येक आत्‍मा हा आपापली भूमिका पार करत असल्‍याचे दिसून येते.
 
Top