सोलापूर -: सार्वजनिक क्षेत्रातील सर्व आस्थापना तसेच 25 किंवा त्यापेक्षा अधिक कामगार कार्यरत असलेले खाजगी क्षेत्रातील उद्योजक यांनी ई आर 1 व ई आर 2 विवरणपत्र भरावे. तसेच प्रत्येक तीन महिन्यानंतर ते संबधीत कार्यालयास पाठवावे.
    उद्योजकांनी आपला ईमेल, दुरध्वनी क्रमांक, मेलींग अड्रेस अद्यावत करावेत. तसेच www.maharojgar.gov.in  या वेबसाईटवर अधिक माहिती घ्यावी. मनुष्यबळ विवरणपत्र न     पाठविणा-यावर आस्थापना - सक्तीने अधिसुचीत कायदा 1959 मधील नियम भाग 5 (1) आणि (2) मधील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र (दुरध्वनी क्र. 0217-2622113) सोलापूर या ठिकाणी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
 
Top