सोलापूर :- महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील शासन निर्णय क्रमांक साविव्य/1005/प्र.क्र.2075/ना.पु.28, दिनांक 3 नोव्हेंबर 2007 अन्वये सध्याची रास्त भाव दुकाने/ किरकोळ केरोसीन परवाना तसाच ठेवून, आजमितीस रद्द असलेली व यापुढे रद्द होणारी, राजीनामा दिलेली व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाची रास्त भाव धान्य दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने स्वयंसहाय्यता गटांना देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच जेथे स्वयंसहाय्यता गट उपलब्ध होणार नाहीत अशा ठिकाणी सध्याच्या प्राथम्य सुचीनुसार रास्त भाव धान्य दुकाने व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर करण्यात यावेत असाही निर्णय शासनाने घेतला आहे.
    त्यानुसार सांगोला तालुक्यातील मौजे राजापूर, महुद बु., निजामपूर, लिगाडेवाडी, लक्ष्मीनगर, कराडवाडी आणि ठोबरेवाडी (अचकदाणी) आदी गावात किरकोळ केरोसीन परवाना चालविण्याची इच्छा असेल अशा बचत गटांनी संबंधित तहसिल कार्यालयात दिनांक 1 ते 15 नोव्हेंबर 2013 पर्यंत विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत. अर्ज कार्यालयीन  वेळेत स्विकारले जातील. अर्जदाराने अर्ज स्वत: सादर करावेत. अर्जाचे विहित नमुन्यातील कोरे फॉर्म सांगोला तहसिल कार्यालयात रक्कम रु. 5/- च्या चलनाने सरकारी खजिन्यात जमा करुन घेवून दिले जातील.
    बचत गटांना परवाने देण्याबाबतच्या अटी, नियम तसेच आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासंदर्भात अधिक माहिती संबंधित तहसिल कार्यालयात मिळेल. रास्त भाव दुकान मंजुरीसाठी बचत गटाची गुणानुक्रमे निवड करण्यात येईल. मुदतीनंतर व अपु-या कागदपत्रासह आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नसल्याचे जिल्हा पुरवठा कार्यालयाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
 
Top