सोलापूर -: राज्य शासनाने सातारा, सांगली व सोलापूर जिल्हयाकरीता महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक मंडळ गठीत केले असून ते  सांगली जिल्हा सुरक्षा मंडळ (सांगली) या नावाने कार्यरत आहे.
    वरील तीन जिल्हयात कारखानदार, व्यावसायीक तथा दुकानदार यांनी खाजगी सुरक्षा रक्षक पुरविणा-या एजन्सीकडून सुरक्षा रक्षक कर्मचा-यांची नेमणुक न करता ही नेमणुक सांगली जिल्हा सुरक्षा मंडळाकडूनच (सांगली) करुन घ्यावी.
अनोंदीत सुरक्षा रक्षकांची नेमणुक करणे हा गुन्हा असून अशा विरुध्द नोकरीचे नियमन व कल्याण अधिनियम 1981 व त्या अंतर्गत तरतुदीनुसार संबधितावर गुन्हा दाखल करण्यात येईल. तरी संबधितांनी आपली आस्थापना या मंडळात नोंद करुन घ्यावी व त्यानुसार सुरक्षा रक्षकांची मागणी करावी. असे आवाहन एन. पी. पाटणकर, सहाय्यक कामगार आयुक्त व अध्यक्ष सांगली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.
 
Top