ना घर, ना दार जाईल तिथं पाल टाकायचं, पालाची व्यवस्था नसेल तर त्या त्या गावातील सरकारी शाळेचा आसरा घेऊन तिथच उघडयावर रात्र काढायची शाळोचे मैदान हेच या कलाकारांचे घर आकाश हेच पांघरून धरती हीच त्यांची माता असे मानले जाते. गावात दोन चार ठिकाणी आपले कलेचे कार्यकम करून येथे येऊन आसरा घ्यायचा तिथच दोन दगड मांडुन पोटाची आग विझवण्यासाठी कांहीतरी करून पोटात ढकलायच. ऊन, वारा, पाऊस याची तमा नाही अशीच कांहीशी अवस्था या फिरत्या कलाकार कुटूंबांची असल्याचे निदर्शनास येतो.
यासंदर्भात संबंधीत कलाकारांकडे चौकशी केली असता, आम्हाला इलक्शनच भुषान काय बी नाय. आमच्याकडं इलक्शान कार्डच नाय. आन म्हत्वाच म्हंजी आमाला निवडणुकीच काय देना घेना नाय. कारण रोजच्या करमणुकीच्या कार्यक्रमातून प्रेक्षकांकडुन मिळणारा प्रतिसाद व प्रेक्षक म्हंजीच आमच मायबाप व आमच सरकार हाय. आमच्या सोयी सविधाकडं कुणाचचं ध्यान नाय. रेशनकार्ड नाय, त्यामुळे गावाकडं गेल तर रेशनदुकानदार यादीत नाव नसल्यामुळं धान देतच नाय. शासन कायच देत नाय. आला दिस कसा काढायचा हाच मोठा प्रश्न आमच्यासमोर दरदिवशी असतो. बाकी गोष्ठीकडं ध्यान देयाला आमाला येळच राहात नाही. अशा अनेक प्रश्नांनी या फिरत्या कलाकार कुटुंबांना घेरले असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
नऊ महिने जिवापाड जपलेला पोटचा गोळा बालपणातच आम्हाला आधार बनुन जातो. आम्हीही दोन-तिन वर्षांच्या बालकांना आधार देऊन त्याच्याकडुन कसरती करून घेऊन व त्यांचा जिव धोक्यात घालुन पोटासाठी त्यांचा जिव टांगनीला लावतो. माणसांच्या आतडयाला दोनदाच ताण पडतो, एकदा खळखळुन हसल्यावर व दुस-यांदा आतडयांना ताण देऊन कसरतीचे प्रयोग करून दाखवताना. येथे मात्र दुसरा प्रकार कलाकारांच्या वाटयाला येतो. शेवटी मरण्यापेक्षा करमणुक करत करत जगता जगता मेलेल बर, म्हणुनशान जिव टांगनीला लावुन करमणुकीचे कार्यक्रम करतो, असेही त्यांनी सांगितले.