हन्नुर : नागराज गाढवे
अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथे कांचन फौंडेशन शाखेचे उद्घाटन सरपंच उमाकांत गाडवे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुदिप चाकोते हे होते.
यावेळी बोलताना चाकोते म्हणाले गेल्या चार वर्षांपासून फौंडेशनच्या माध्यमातून शहरी आणि ग्रामीण भागातील गरीब आणि वंचित घटकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे कोरोना महामारी काळात अनेक गावांमध्ये मास्क चे वितरण करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना सरपंच गाडवे म्हणाले की कांचन फौंडेशनचे कार्य प्रेरणादायी आणि कौतुकास्पद असून अनेक निराधार महिलांना मदत करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे यावेळी गावातील गरीब महिलांना साडी वाटप करण्यात आले बोरेगावात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्य केलेल्या युवक आणि अंगणवाडी सेविका आशा सरपंच ग्रामपंचायत शिपाई यांना फौंडेशनच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास बोरेगाव शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण शिवशेटटी उपाध्यक्ष अनिल पाटील रविकांत चिकलंडे भुताळी पुजारी सिध्दाराम बणजगोळे प्रदिप मेणसे महिला बचत गटाच्या सुरमदेवी खांडेकर उपसरपंच संगीता औरसंगे मुस्ती शाखेचे अध्यक्ष शेखर पाटील शहराध्यक्ष कल्याणराव चौधरी यांच्यासह कांचन फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.