हन्नुर : नागराज गाढवे 

 अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील ग्रामपंचायत सरपंच उमाकांत गाडवे यांची अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्षाचे चिटणीस पदी निवड झाल्याबद्दल श्री बृहन्मठ होटगी संस्था संचलित श्री मल्लिकार्जुन प्रशालेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर हे होते यावेळी मुख्याध्यापक रेवणसिद्ध रोडगीकर यांनी गाडवे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

 यावेळी बोलताना उमाकांत गाडवे यांनी भारतीय जनता पक्षाने चिटणीस पदी निवड केली यामुळे जबाबदारी वाढली आहे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील युवकांना संघटित करून पक्ष वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे .यावेळी बसवणप्पा पावले श्रीशैल स्वामी प्रशालेतील शिक्षक  प्रकाश गुरव शिवयोगी गंगा अरविंद बणजगोळे म्हमाणे संपदा कुलकर्णी आदी उपस्थित होते.

 
Top