तुळजापूर,दि.२५ :  संसर्गजन्य कोरोना विषाणुवर लसीकरण मोहीम सुरुवात करण्यात आली असुन कोरोना रुग्ण  वाढत चाललेला आहे. कोविड लस ही सुरक्षित असुन याविषयी तुळजापूर  येथे जनजागृती आभियानातुन माहिती देण्यात येत आहे.


 महाभयंकर कोरोनाला रोखण्या करीता आपल्या देशाने शंभर टक्के यशस्वी लस  विकसीत केलेली आहे. ही कोरोना रोधक लस केंद्र सरकारने सर्वासाठी शासकीय रूग्णालयात मोफत  दिली जात आहे. या  लसीकरणाबाबत जनजागृती आभियान इंद्रजित साळुंके , बाळासाहेब भोसले , प्रसाद पानपूडे , दिनेश बागल आदीनी आयोजीत केली.  संपूर्ण  शहरात ध्वनी क्षेपकाच्या माध्यमातून व पञकाद्वारे शहरातील सर्व नागरीकांपर्यंत लसिकरणाची माहिती पोहचवण्याचे आभियानातुन करण्यात आले.  या आभियानाची सुरुवात श्री तुळजाभवानी मंदिरा समोर नागेश नाईक , शिवाजी बोधले व गुलचंद व्यवहारे यांच्या हस्ते उद्घाटनाने करण्यात आली .

 कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपुर्ण राज्यात हाहाकार माजवला आहे. तरीही नागरीक याबाबत गंभीर दिसत नाहीत. लसीकरणास सुरवात झाली असुन  बरेचशे नागरीक चुकीच्या आफवे मुळे लस घेण्याचे टाळत आहेत . या जनजागृती आभियानाद्वारे सर्व नागरीकांना लस सुरक्षित आसून कोनतीही शंका मनात न घेता निर्धास्तपणे कोरोना रोधक लस घेण्याचे आव्हान  करण्यात आले आहे.
 
Top